Friday, August 28, 2009

दादांच्या कामांचा प्रगती अहवाल




** पूर्व इतिहास :- सोलापूर जिल्ह्यामध्ये माढ़ा तालुका अवर्षणग्रस्त व दुष्काळाने ग्रासलेला तालुका म्हणून सर्वश्रुत होता॰ या तालुक्यामध्ये सन २००० पूर्वी अनेकवेळा साखर कारखाना उभारणीसाठी प्रयत्न झाले परंतु तत्कालीन नैसर्गिक परिस्थितीमुळे त्यामध्ये यश आले नाही॰
माढ़ा तालुक्यामध्ये भीमा नदीवर तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उजनी धरणाचे भूमिपूजन करून वर्ष १९८० मध्ये धरण पूर्ण झाले॰ या धरणामुळे पुणे , सोलापूर परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी,शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी पाण्याचा लाभ झाला॰ याशिवाय उजनी धरण कालव्याचे तालुक्यातील पश्चिम भागात पाणी मिळाले,मात्र बहुतांशी भाग कोरडाच होता॰
मादा तालुक्यामध्ये कै. आ.विठ्ठलभाऊचे साखर कारखाना उभाराणीचे स्वप्न होते .त्यांनी कारखाना उभारणीसाठी वेळोवेळी प्रयत्न केले .बबनदादा शिंदे आमदार झाल्यानंतर खरा अर्थाने सहकारी साखर कारखाना उभारणीस गती आली.माढा तालुक्याम्ध्ये बबनदादांचे धडाडीच्या नेतृत्वातून दूध उत्पदनामध्ये उत्तुंग भरारी मारली .बबनदादा शिंदे सोलापुर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन झाले व जिल्ह्यामध्ये खरया अर्थाने धवलक्रांती घडून आली.दैनिक ६०००० लीटर दूध संकलन होत असलेला संघ मा.दादांचे कारकिर्दीमध्ये दैनिक ३.५० लाख लिटर्स दूध संकलन करू लागला .पर्यायाने सोलापुर जिल्ह्यातील शेतकरी शेतीस पूरक जोडधंदा म्हणून दूध उत्पादन करू लागले व शेतकरयांचे -कष्टकरयांचे जीवनामध्ये नवीन आर्थिक क्रांती घडून आली .मात्र शेतकरयांना खरया अर्थाने आर्थिक सबळ करावयाचे असेल तर त्यांच्या शेतात पाणी गेले पाहिजे ,त्यासाठी प्रतम पाणी नंतर ऊस व साखर कारखाना त्यासाठी आ.बबनदादांनी प्राधान्याने प्रयत्न चालू केले .त्या अनुषगांने बबनदादांनी माढा तालुक्याच्या पूर्व भागात वाहत असलेल्या वर्षातून १० महिने कोरडी असलेल्या सीना नदीमध्ये उजनी धरणातून ३० कि.मी .अंतराचा आशिया खंडातील सर्वात मोठा जमिनी खालून पाण्याचा बोगदा सन २००३ मध्ये पूर्ण केला .या पाण्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागात पिण्यासाठी व शेतीसाठी वर्षभर पाणी उपलब्ध झाले॰
केंद्र शासनाने नवव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत साखर उद्योगास मुक्त धोरण लागू केले .त्यानुसार दि.१६/०९/१९९८ रोजी विठ्ठल शुगर्स मॅन्युफॅक्चरींग लि.या नावाने खासगी कारखाना उभारणीसाठी केंद्र शासनाचे आय.ई.एम.मिळविले.सन १९९८ च्या दीपावली पाडव्याच्या मुहुर्तावर विठ्ठल शुगरचे नावाने शेअर जमा करण्यासाठी रांझणी येथे पहिली सभा झाली.या तालुक्यातील आम जनतेची कारखाना उभारण्याची तीव्र इच्छा असल्याने पहिल्याच दिवशी शेअर्स कलेक्शन १ कोटी रुपये रोख ज़मा करून विक्रम प्रस्तापित केला .कारखान्यास ४ कोटी ८० लाखांचे भागभांडवलाची आवश्यकता असताना सभासदांनी उत्स्पूर्त प्रतिसाद देऊन ९ कोटी २० लाखांचे शेअर्स जमा करून महाराष्ट्रातच नव्हे तर देशामद्ये विक्रम प्रस्तापित केला .१९९९ मध्ये महाराष्ट्र शासनाने सहकारी साखर कारखाना उभारणीस मान्यता देण्याचे धोरण जाहीर झाले.त्यावेळी विठ्ठल शुगर्स मॅन्युफॅक्चरींग ऐवजी माढा तालुका सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये मा.साखर आयुक्त ,पुणे यांच्याकडे एसयुआर /एमएडीएच/पीआरजी /एएस ९०/१९९९ दि .२१/०५/१९९९ रोजी नोंदणी केली.हा कारखाना पिपंलनेर येथे उभा करण्यासाठी पिपंलनेर येथील १६५ एकर जमीन खरेदी करून दि .१०/१२/१९९९ रोजी या ठिखाणी नामदार अजित पवार यांच्या हस्ते व नामदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे भूमिपूजन केले .भविष्याचा वेध घेउन शासनाने मंजूर केलेली प्रतिदिन १२५० में .टन गाळपक्षमता २५०० में .टन प्रयत्न केले .त्यानुसार दि .०३/०८/२००० रोजी आपले कारखान्यास २५०० में .टन प्रतिदिन ऊस गाळप क्षमतेसाठी शासनाकडून मान्यता मिळाली.कारखाना उभारणी करीत असताना इमारत बांधकाम व इतर बाबीमध्ये दोन कोटीची बचत केली .त्यामुळे पहिल्याच वर्षी १.५० कोटी रुपयांचे अटोमेशन केले .दि .२०/०१/२००१ रोजी राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा .शरद पवार यांच्या हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामास सुरुवात झाली व प्रथम गळीत हंगामाध्ये उच्चांकी गाळप करण्यात आले .या चाचणी गळीत हंगामामध्ये विक्रमी गाळप केल्याबद्दल देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नॅशनल फेडरेशन ऑफ़ को-आपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि .,नवी दिल्ली यांच्याकडून दि .१६/०९/२००२ राजी तत्कालीन केन्द्रीय कृषिमंत्री शरद यादव यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले .


** डिस्टिलरी प्रकल्प :- सहकारी साखर कारखाना यशस्वीरित्या चालविल्यानंतर सभासद शेतकरांना जास्तीतजास्त आर्थिक मोबदला मिळण्याच्या दृष्टीने साखरेबरोबर उपपदार्थ निर्मिती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आ .बबनदादा शिंदे यांनी ओळखले व त्यानुसार ३१/१०/२००३ रोजी कारखान्याने प्रतिदिन ३०००० लिटर्स अतिशुद्ध मद्यार्क व ३०००० लिटर्स इथेनॉल उत्पादन करण्यात येत आहे .
** कच्ची साखर आयात :- सन २००५-०६ हंगामामध्ये साखर आयात करून पक्की करण्याच्या व्यवहारात ५ कोटी रुपयांचा फायदा मिळाला


** उधारीने बेणे व ख़त वाटप :- सन २००५-०६ लागवड हंगामामध्ये सभासद शेतकरयाना १३५० एकरासाठी कारखान्यमार्फत उधारीने को ६७१ व कोशी ९४०१२ या जातीचे बेणे वाटप केले आहे.
सन २००६-०७ हंगामामध्ये माहे ऑगस्ट,सप्टेम्बर,ओक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात ऊस लागन करणारया सभासदांना प्रतिशेअर्स ३ एकरासाठी बेणे व प्रतिएकर ४ पोती १०:२६:२६ याप्रमाणे ख़त कारखान्यामार्फत ऊस बेणे २.५ कोटी रुपये व खते ३ कोटी रुपयांचे उधारीने पुरवठा करण्यात आली
कारखान्याने जवळपास ७ ते ८ कोटी रुपये गुंतवून सन २००७-०८ मध्ये लागवड हंगामासाठी शेतकरांना त्यांचे क्षेत्राच्या प्रमाणात प्रति एकर ४ पोती यूरिया व ४ पोती १०:२६:२६ रासायनिक ख़त सभासद व बिगरसभासदांना उधारीने बिगरव्याजी वाटप केले आहे .तसेच सन २००८-०९ लागवड हंगामासाठी शेतकरांना त्यांच्या क्षेत्राच्या प्रमाणात प्रतिएकर ४ पोती १०:२६:२६ रासायनिक ख़त उधारीने वाटप चालू आहे .
** गाळपक्षमता विस्तारीकरण :-
** सहवीज निर्मिती प्रकल्पाचे विस्तारीकरण :-
** डिस्टिलरी प्रकल्पाचे विस्तारीकरण :-
** हरितक्रांती व गणेश पाणीपुरवठा संस्था :-
** कम्पोस्ट ख़त :-
** रिफायनरी शुगर प्रोजेक्ट :-
** जनावर छावणी:-
** शैक्षणिक सुविधा:-
** भरीव ऊस दर:-
** कच्ची साखर:-
** सामुदायिक विवाह सोहळा:-
** नेत्ररोग चिकित्सा ,मोतिबिंदु शस्त्रक्रिया :-



No comments: